नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आतापर्यंत ६ कोटी ५ लाख ३० हजार ४३५ जणांना कोरोना प्रतिबंधक लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. देशात काल कोविड-१९च्या ६८ हजार २० नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्यांची एकूण संख्या १ कोटी २० लाख ३९ हजार ६४४ झाली आहे. काल २९१ रुग्णांचा मृत्यू झाला.

देशात या संसर्गानं आतापर्यंत १ लाख ६१ हजार ८४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ३२ हजार २३१ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत १ कोटी १३ लाख ५५ हजार ९९३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोविड- १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९४ पूर्णांक ३२ शतांश टक्के झाला आहे. देशात सध्या ५ लाख २१ हजार ८०८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.