पुणे : महर्षीनगर येथील माळी आवाज नागरी सह पतसंस्था व माळी समाज विकास संस्था संचालित माळी समाज वधु-वर सूचक केंद्राचे उद्घाटन माजी आमदार योगेश टिळेकर यांच्या शुभ हस्ते झाले. प्रथमता सावित्रीबाई फुले यांच्या १२४ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. सदर कार्यक्रमास रूपालीताई धाडवे नगरसेविका, पुणे मनपा, स्मिता शैलेश लडकत संचालक पुणे कॅन्टोन्मेंट सह बॅक, शैलेश लडकत, सुनिता नितीन भगत, शशिकला ढोले पाटील, सुदाम धाडगे सर, प्रदीप जगताप, नानासाहेब कुदळे, अँड. दिगंबर आलाट, रवी चौधरी (माजी अध्यक्ष पुणे शिक्षण मंडळ) आदी मान्यवर उपस्थित होते.

मा. टिळेकर यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले की, आज माळी समाजा महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येने आहे. या समाजातील अनेक मुले-मुली उच्च शिक्षित आहे. एकत्र कुटुंब पद्धती जास्त नसल्यामुळे मुला-मुलींची लग्न ठरविताना अडचणी येत आहेत. त्यासाठी आज वधू-वर सूचक मंडळाची नितांत आवश्यकता असून, ही काळाची गरज आहे. हे काम वधू वर मंडळ चांगल्या प्रकारे करत आहे. टिळेकर, गाडेकर यांचे लग्न जमण्यासाठी खूप मोठे योगदान आहे. त्यांनी यामध्ये जास्त लक्ष देऊन अनेक विवाह सहज कसे संपन्न होतील याची काळजी घ्यावी. त्यांच्या हस्ते नवीन वेबसाइटचे उद्घाटन करण्यात आले.

या प्रसंगी रवी चौधरी (माळी रिश्ते-धागे), प्रदीप जगताप (प्रथमा वधु-वर सुचक केंद्र), सुदाम धाडगे (सप्तपदी वधू वर सूचक केंद्र), नानासाहेब कुदळे यांनी संस्थेबद्दल गौरवोद्गार काढले आणि शुभेच्छा दिल्या.

रूपाली धाडवे यांनी सांगितले की, वधू-वर सूचक मंडळाचे संचालक गेल्या १५-२० वर्षापासून खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे. ते पुढे सुद्धा चांगल्या पद्धतीने करतील असा मला विश्वास वाटतो.

भविष्यामध्ये संस्थेच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळा, वधू-वर मेळावे, ऑनलाइन वधु वर मेळावा, व्यवसाय व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, विवाह समुपदेशन सुरू करण्यात येणार आहे. या संस्थेचे महाराष्ट्रभर 15 वधू-वर सूचक केंद्र आहेत.

कार्यक्रमाचे आयोजन माळी समाज विकास संस्थेच्या वतीने करण्यात आले. प्रास्ताविक अध्यक्ष हनुमंत टिळेकर यांनी केले. परिचय स्वागत समितीचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुधाकर गिलचे व माधुरी गाडेकर यांनी केले. सूत्र संचालन पांडुरंग गाडेकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन सुनंदा गिरमे यांनी केले.