नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वेनं या वर्षी जूनमध्ये १२५ दशलक्ष टनांहून अधिक मासिक माल वाहतुकीची नोंद केली आहे. जून २०२१ मधील वाहतुकीच्या तुलनेत ही वाढ ११ टक्क्यांहून अधिक आहे. रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे की, ही वाढ १३ दशलक्ष टनांहून अधिक कोळशाच्या वाहतुकीमुळं असून त्यानंतर सिमेंट आणि अन्नधान्यांचा क्रमांक लागतो.

या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एकत्रित माल वाहतूक ३७९ दशलक्ष टनांपेक्षा जास्त झाली आहे, २०२१-२२ मध्ये याच कालावधीत ती ३३९ दशलक्ष टन होती.