नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट करंडक मालिकेतला भारताविरुद्धचा तिसरा सामना आज ऑस्ट्रेलियाने 9 गडी राखून जिंकला. सामन्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर उस्मान ख्वाजा आणि ट्रॅविस हेड खेळायला उतरले तेव्हा रविचंद्रन आश्विनने दुसऱ्याच चेंडूवर ख्वाजाला बाद करुन धक्का दिला. नंतर मार्नस लॅबुशेन आणि हेडर या जोडीने संयमाने खेळून विजयासाठी आवश्यक 76 धावा 18 षटकं आणि 5 चेंडूत पार केल्या. या डावात आठ गडी बाद करणारा नॅथॉन लायन सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. चार सामन्यांच्या मालिकेत भारत दोन – एकनं आघाडीवर आहे. मालिकेतला शेवटचा सामना येत्या नऊ तारखेपासून अहमदाबाद इथं सुरु होणार आहे.या सामन्यात 50 ची सरासरी राखून ऑस्ट्रेलियाने जागतिक कसोटी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत थेट प्रवेश मिळवला आहे.