नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सागरी किनाऱ्यावर आणि देशातल्या सर्व उपाहारगृहात, हॉटेलमध्ये, पंचतारांकित हॉटेलमध्ये एकदा वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकवर एका वर्षाच्या आत बंदी आणावी असे आदेश बांगलादेशच्या उच्च न्यायालयानं बांगलादेश सरकारला दिले आहेत.

प्लास्टिक स्ट्रॉ, प्लॅस्टिकची भांडी, खाद्य पदार्थांची वेष्टण, बाटल्या आदी उत्पादनांवर कायम स्वरूपी बंदी घालण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. बांगलादेशच्या पर्यावरण संवर्धन कायद्यान्वये पॉलीथीनवर २००२ पासून बंदी घालण्यात आली आहे. ११ संघटनांनी केलेल्या याचिकेवर न्यायालयानं हा निर्णय दिला.