नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पिकावर उन्हाळ्याचा कोणताही विपरीत परिणाम अद्याप झाला नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. गव्हाच्या पिकाच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण विभागानं गठीत केलेल्या समितीनं आपल्या बैठकीत हे सर्वेक्षण सादर केलं. हरियाणा आणि पंजाब इथं वेळेवर किंवा वेळे पूर्वी केलेल्या गव्हाच्या पेरणीपैकी ७५ टक्के क्षेत्र मार्च महिन्यात उन्हाळ्यामुळे प्रभावित होणार नाही, तसंच भारतीय कृषी संशोधन परिषद आणि राज्य कृषी विद्यापीठांनी हवामान बदलाचा सामना करू शकेल असं गव्हाचं वाण विकसित केलं आहे. असं समितीच्या सर्वेक्षणात म्हटलं आहे.