नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय परिक्षा परिषदेनं विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राष्ट्रीय पात्रता परिक्षा ‘नेट 2022’ साठीचं वेळापत्रक काल जारी केलं. ही परिक्षा डिसेंबर 2021 आणि जून 2022 या दोनही सत्रांसाठी एकत्रितपणे होणार आहे.

येत्या 9 जुलै रोजी होणाऱ्या परिक्षेसाठीची ओळखपत्र काल एनटीएनं जारी केली असून इतर परिक्षांची ओळखपत्र लवकरच जारी कली जातील 9, 11, 12 जुलै आणि 12, 13 आणि 14 ऑगस्ट या तारखांना ही संगणक आधारीत परिक्षा होणार आहे.