नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेमधे इंधनाची प्रचंड टंचाई निर्माण झाल्याचा इशारा तिथले ऊर्जामंत्री कांचन विजयशेखर यांनी दिला आहे. सरासरी मागणीच्या तुलनेत केवळ एक दिवस पुरेल एवढाच पेट्रोल साठा असल्याचं त्यांनी सांगितलं. देशात यापूर्वीच जीवनावश्यक वस्तूंच्या वाहनांखेरीज इतर वाहनांना पेट्रोल आणि डिझेल विक्री बंद करण्यात आली आहे. एक आठवडाभर शाळांना सुट्टी आहे. राजधानी कोलंबोमधे अध्यक्ष गतभय राजपक्षे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी निदर्शनं चालू आहेत.