नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँगोमधल्या गोमा या दाट लोकवस्ती असलेल्या शहरात काल एक प्रवासी विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत, सुमारे २९ जण ठार झाले. विमानातल्या एका प्रवाशासह जखमी झालेल्या इतर १९ जणांना तातडीनं रुग्णालयात दाखल केलं असून, त्यांच्या उपचार सुरु आहेत अशी माहिती उत्तर किवूच्या स्थानिक सरकारनं दिली.
अपघातग्रस्त विमान हे स्थानिक स्तरावर उड्डाणसेवा देणाऱ्या कंपनीचं आहे. या विमानानं गोमापासून ३५० किलोमीटर अंतरावरच्या बेनी इथं जाण्यासाठी उड्डाण केलं, मात्र उड्डाणानंतर लगेचच ते कोसळलं.