मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य शासनानं गेल्या काही दिवसात काही जिल्हयांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय बांधायला परवानगी दिली आहे. ही महाविद्यालयन कोणत्या पद्धतीने बांधावीत, हे काम किती काळात पूर्ण होईल, याबाबत एक आराखडा तयार करावा, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत.
वैद्यकीय शिक्षण विभागाच्या प्रोजेक्ट मॉनिटरींग सिस्टीम युनिटची बैठक काल मंत्रालयात देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत ते बोलत होते.
नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बांधण्याचं काम पीपीई मॉडेल, हायब्रीड ॲन्युटी किंवा इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन यांच्याकडून वित्तपुरवठा, या कोणत्याही पध्दतीनं नियोजन करीत असताना त्यातले बारकावे शोधावेत. या सर्व तत्वांचा अभ्यास करत असताना याला अंतिम स्वरुप देऊन लवकरच येणाऱ्या मंत्रीमंडळ बैठकीत याबाबतचं सादरीकरण करावं, असं त्यांनी सांगितलं.