नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत सहा कोटी तीस लाखांहून अधिक कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. गेल्या २४ तासात १९ लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्याच आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. सध्या देशाचा कोविड रुग्ण बरे होण्याचा दर ९४ पूर्णांक ११ टक्के इतका झाला आहे. गेल्या २४ तासात ४१ हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले. अचानक काही राज्यांत आलेल्या लाटेमुळे मात्र नवबाधीतांची संख्या सातत्यानं वाढतच आहे. देशभरात सध्या जवळपास साडेपाच लाखांहून अधिक रूग्णावर उपचार सुरू आहेत. गेल्या २४ तासात देशात तीनशे चोपन्न जणांचा या आजारानं मृत्यू झाल्याच आरोग्य मंत्रालयानं सांगितल.