मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात लॉकडाऊन लागू करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, मात्र निर्बध कठोर करण्यासाठी पावलं उचणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. लोकांनी याची मानसिक तयारी ठेवावी, असं सांगत जिथे गर्दी होते तिथे निर्बंध आवश्यक आहेत, गर्दी होऊच नये याचं भान सगळ्यांनी ठेवायला हवं, असं ते म्हणाले. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. तोंडातून उडणाऱ्या शिंतोड्यांमधून कोरोना अधिक पसरतो त्यामुळे मास्क वापरा, नियम पाळा आणि कोरोना टाळा असं आवाहन टोपे यांनी केलं.

कोविड रुग्णांसाठी राज्यात कुठंही खाटांची कमतरता नाही, सगळीकडे आवश्यक तितक्या खाटा उपलब्ध असून खाटांची संख्या आणखी वाढवण्याचे निर्देश दिले आहे, मुंबईत आयसीयूच्या ४०० खाटा उपलब्ध आहेत, असं त्यांनी सांगितले.