मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं निर्बंध आणखी कडक केले जाणार असल्याचं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
लॉकडाऊन किंवा अंशतः लॉकडाऊन लागू होण्याच्या शक्यतेबद्दल त्यांनी सांगितल की, लोकांच्या हिताचा विचार करून निर्णय घेतले जातील. बेजबाबदार नागरिकांमुळे कोरोना वाढत असून त्याचा आरोग्य सेवेवर ताण येत असल्याचंही त्यांनी सांगितलं. या संदर्भात आज संध्याकाळी मुख्यमंत्री योग्य त्या सूचना देणार असल्याचेही त्या म्हणाल्या.