JAMMU, APR 1 (UNI):- A youth receiving a dose of the COVID-19 vaccination starts for above 45 years in phase 3, in Jammu on Thursday. UNI PHOTO-2U

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात लसिकरणाचा वेग वाढत असून कालपर्यन्त ६,८७,८९,१३८ जणांना कोविड प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. यामध्ये काल एकाच दिवसात ३६, ७१ , २ ४२ जणांना लस देण्यात आली. तर देशभरात कोरोनाबाधितांची संख्या १, २३, ३ ,१३१ झाली आहे. देशात सध्या ५ ,८४,०५५ जणांवर उपचार सुरू असून त्यातील निम्म्याहून अधिक  म्हणजे ३ ,५७,६०४ रुग्ण एकट्या महाराष्ट्रातील आहेत. तर देशात काल ५०, ३५६ जणांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे देशभरात बरे झालेल्यांची संख्या १ कोटी १५ लाखांच्या पुढे गेली असून बरे झालेल्यांच प्रमाण ९३ पूर्णांक ८९ शतांश टक्के झालं आहे. तर देशभरात काल ४ शे ६९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून एकंदर मृतांची संख्या १,६३,३९६ झाली आहे.

मृतांमध्येदेखील राज्याची संख्या जास्त असून राज्यात कालपर्यंत ५४ हजार ६ शे ४९ जणांचा मृत्यू झाला आहे. काल राज्यात एकंदर २ शे २७ जणांचा मृत्यू झाला त्या खालोखाल पंजाबमध्ये ५५ तर छत्तीसगड मध्ये ३९ जणांचा मृत्यू झाला आहे. काल देशभरात ३१, ४८९  नव्या रुग्णांची भर पडली असून त्यातील जवळपास निम्मे म्हणजे १५ ,७१७ रुग्ण एकट्या महाराष्ट्रातील आहे. तर देशात उपचाराधीन असलेल्या रुग्णांपैकी ३,५७,६०४ रुग्णदेखील एकट्या महाराष्ट्रातील आहेत. देशभरात काल ११,१३,९६६  चाचण्या करण्यात आल्या असून, त्यात ८१ ,४६६ कोरोनाबाधित आढळले आहेत. चाचण्यांच्या तुलनेत बाधित आढळण्याच हे प्रमाण ७ पूर्णांक ३ दशांश टक्के आहे.देशातील रुग्णसंख्येपैकी सुमारे ८० टक्के रुग्ण महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगड, केरळ, पंजाब आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. तर अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या राज्यांमध्ये काल एकही बाधित आढळला नाही.

दरम्यान महाराष्ट्र राज्यात ६० वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या आणि ४५ वर्ष वय परंतु सहव्याधी असणाऱ्या नगरिकांच लसीकरण करण्यास राज्यात सुरुवात झाल्यानंतर कालपासून सहव्याधी असो किंवा नसो अशा ४५ आणि त्या पुढे वय असणाऱ्या नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली आहे. या टप्प्यात काल एकाच दिवशी ३ लाखांपेक्षा अधिक जणांना लस देण्यात आली. आतापर्यंत राज्यात ६५ लाखांपेक्षा जास्त जणांना लस देण्यात आली आहे. तर नव्या टप्प्यात ३ हजार २ शे ९५ लसीकरण केंद्र उभारण्यात आली आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने दररोज ३ लाख जणांचं लसीकरण करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे.