नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण मंत्री राजनाथ सिहं यांनी आज स्वदेशी बनावटीच्या हलक्या वजनाच्या प्रचंड लढाऊ हेलिकॉप्टर्सचा भारतीय वायुसेनेत समावेश केला. जोधपूर इथल्या भारतीय वायुदलाच्या तळावर झालेल्या समारंभात या हेलिकॉप्टर्सचा १४३ हेलिकॉप्टर युनिटमध्ये समावेश करण्यात आला.
हलक्या वजनाच्या लढाऊ विमानांच्या समावेशामुळे भारतीय वायुदलाची लढण्याची क्षमता वाढणार असून आत्मनिर्भर भारताच्या दिशेने हे एक मोठं यश असल्याचं राजनाथ सिंह यावेळी म्हणाले. कारगिल युद्धाच्या काळात या लढाऊ विमानांची गरज निर्माण झाली होती आणि दोन दशकांपासून ही मागणी पूर्ण करण्याच्या दिशेने प्रयत्न केले जात होते असं ते म्हणाले.