नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात वाचन, लेखन आणि पुस्तक संस्कृती रुजावी यासाठी युवा लेखकांना मार्गदर्शन करण्यासाठीच्या प्रधानमंत्र्यांच्या युवा २.० योजनेचं काल उद्घाटन झालं. युवा योजनेच्या पहिल्या टप्प्याला २२ भारतीय भाषा आणि इंग्रजी भाषेतल्या युवा आणि उदयोन्मुख लेखकांनी दिलेला भरघोस प्रतिसाद लक्षात घेऊन, युवा २.० योजना सुरु करण्यात आल्याचं शिक्षण मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

युवा २.० योजनेचा शुभारंभ, देशातल्या युवा वर्गाला भारतातली लोकशाही समजून घेण्यासाठी आणि त्याची प्रशंसा करण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या प्रधानमंत्र्यांच्या विचारांशी युवा २ अर्थात युवा, उदयोन्मुख आणि वैविध्यपूर्ण लेखक योजना सुसंगत आहे असं शिक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे.