जनौषधी सुविधा सॅनिटरी नॅपकिन आता एक रुपयात
नवी दिल्ली : जेनेरिक औषधांच्या दुकानांचे स्थान दर्शवणाऱ्या ‘जनौषधी सुगम’ मोबाइल ॲप्लिकेशनचे अनावरण आज नवी दिल्ली इथे रसायने आणि खत मंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांच्या हस्ते झाले.
जनऔषधी सुविधा ऑक्झो-बायोडिग्रेबल सॅनिटरी नॅपकिन, प्रति पॅड एक रुपया दराने पंतप्रधान भारतीय जनौषधी केंद्रात उपलब्ध होईल, अशी घोषणाही त्यांनी केली. यामुळे देशातील दारिद्रय रेषेखालील बायकांना स्वच्छता, स्वास्थ्य आणि सुविधा मिळेल