नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल १ लाख ३ हजार ५५८ नवे कोरोनाबाधित आढळले. त्यामुळे देशात आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या १ कोटी २५ लाखाच्या वर गेली आहे. काल ५२ हजार ८०० पेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत १ कोटी १६ लाखापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

देशातला कोरोनामुक्तीचा दर ९२ पूर्णांक ८ दशांश टक्के झाला आहे. सध्या देशभरात ७ लाख ४१ हजारापेक्षा जास्त रुग्ण अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. काल ४९८ रुग्णांचा मृत्यू झाला. देशात आतापर्यंत १ लाख ६५ हजार १०१ रुग्णांचा या संसर्गानं बळी घेतला आहे.

देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशीच्या ७ कोटी ९१ लाख ५ हजारापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. काल १६ लाख ३८ हजारापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्रालयानं सांगितलं.