पिंपरी : वाय.सी.यम. हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रिक्षा आणि खाजगी रुग्णवाहिकांचे निर्जंतुकीकरण करावे, तसेच खाजगी रुग्णवाहिका ताब्यात घ्याव्या म्हणून माधव पाटील यांचे आयुक्तांना निवेदन दिले.
पिंपरी चिंचवड शहरात वेळेवर रुग्णवाहिका मिळत नसल्याने अनेक कोरोणा रुग्ण रिक्षाने रुग्णालय गाठतात. रिक्षा रुग्णांना सोडते आणि तश्याच शहरभर फिरत असतात. यामुळे इतर प्रवाश्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका उद्भवतो.
आधीच रिक्षाचालक आपला जीव धोक्यात घालून, आपली सेवा देत आहेत. त्यामुळे अशा रिक्षांना निर्जंतुकीकरण करणे गरजेचे आहे. त्यामुळे कोरोणा आटोक्यात येण्यासाठी मदत होईल. रोगाचे थैमान सुरू असताना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कोरोणा पसरवणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे.
तसेच शहरातील सर्वच खाजगी रुग्णवाहिका नगरपालिकेने ताब्यात घेऊन’ ओला/उबर’ ज्या पद्धतीने काम करते त्या पद्धतीने रुग्णवाहिकांचे कामकाज करावे. असे केल्याने रुग्णवाहिकांची उपलब्धता नागरिकांना समजेल.
रुग्णवाहिक एकाच जागेवर उभ्या राहणार नाहीत. त्या प्रभावीपणे वापरल्या जातील. यामुळे अनेक रुग्णांना फायदा होईल आणि त्यांचे प्राणही वाचतील. राष्ट्रवादी पदवीधर संघ पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष माधव पाटील यांच्यातर्फे हे निवेदन ट्विटर आणि इतर समाज माध्यामांमार्फत आयुक्त राजेश पाटील यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आले.