मुंबई (वृत्तसंस्था) : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा न घेता त्यांची वर्गोन्नती करावी, लॉकडाऊनच्या काळातील विजबिलात सरसकट माफी करावी, तसंच शेतकऱ्यांना हमी भाव देण्याची मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज वार्ताहर परिषदेत केली.

सध्या सरकारनं छोटे उद्योगधंदे, कारखानदारांना उत्पादन सुरू ठेवण्याची मुभा दिली असली, तरी विक्रीवर बंदी घातली आहे. विक्रीच होणार नसेल तर उत्पादन तरी कसे होईल असा प्रश्न करताना आठवड्यातले दोन ते तीन दिवस विक्रीसाठी दुकाने उघडी ठेवण्याची मुभा द्यावी, अशी सूचना राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे चर्चेदरम्यान केली आहे.