नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व बँकेचं द्वैमासिक पतधोरण उद्या सकाळी दहा वाजता घोषित केलं जाईल. बँकेच्या पतधोरण समितीची द्वैमासिक बैठक काल पासून सुरू झाली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्यावेळी व्याजदरात कोणताही बदल रिझर्व्ह बँकेनं केला नव्हता. सध्या रेपो दर ४ टक्के, तर रिव्हर्स रेपो दर ३ पूर्णांक ३५ शतांश टक्क्यावर कायम आहे.