नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी १३ जुलैला टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंबरोबर दुरदृश्य प्रणालीमार्फत संवाद साधतील. मागच्या महिन्यात प्रधानमंत्र्यांनी भारतीय खेळाडूंच्या ऑलिंपिक तयारीचा आढावा घेतला होता. या बैठकीत प्रधानमंत्र्यांनी कोरोना काळात खेळाडूंचे विना व्यवधान प्रशिक्षण, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळाडूंचा सहभाग, खेळाडूंचे लसीकरण आणि त्यांना विशेष सहाय्य उपलब्ध करून देणं यासारख्या प्रयत्नांबद्दल प्रधानमंत्र्यांनी माहिती दिली होती. मागच्या महिन्यात झालेल्या मन की बात या कार्यक्रमात देखील प्रधानमंत्र्यांनी खेळाडू करत असलेल्या मेहनतीचा उल्लेख केला होता.