मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश सी जे दीपंकर दत्ता यांनी राज्य प्रशासकीय न्यायाधिकरण तसंच केंद्रीय प्रशासन न्यायाधिकरणाची प्रशंसा केली. ते म्हणाले की, मुख्य न्यायाधीशाची भूमिका वठवतांना सजग राहणं जरुरी आहे. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या ३० व्या स्थापना दिनाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. माजी न्यायमूर्ती एस. सी. धर्माधिकारी यांनी यावेळी राज्य प्रशासकीय न्यायाधिकरणाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, न्यायाधिकरणाच्या माध्यमातून सध्या मोठ्या संख्येने सरकारी कर्मचाऱ्यांना कायदेशीर उपाययोजना दिली जाते. कॅट आणि राज्य प्रशासकीय न्यायाधिकरणांकडे त्यांचा उत्कृष्ट दृष्टीकोन आहे. मात्र, त्याचा योग्य रीतीने वापर झाला पाहिजे