नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वाशिम जिल्ह्यात टाळेबंदीत शिथिलता आल्यानं शेतकऱ्यांनी आपला शेतमाल वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये विक्रीसाठी आणला होता. काल जवळपास २० हजार क्विंटल सोयाबीन विक्रीला आला होता.
अपुऱ्या जागेमुळे शेतकऱ्यांना सोयाबीन खुल्या जागेत ठेवावा लागला. संध्याकाळी अचानक मेघ गर्जनेसह मुसळधार पाऊस आल्यानं हजारो क्विंटल सोयाबीन भिजला. आता या शेतकऱ्यांच्या भिजलेल्या सोयाबीनची किंमत व्यापारीच ठरवणार आहेत.