नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या २ लाखांच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. काल देशात ८ हजार १७१ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या १ लाख ९८ हजार ७०६ झाली आहे. काल तब्बल २०४ जणांचा कोविड १९ मुळे मृत्यू झाला. त्यामुळे देशातल्या एकूण मृतांची संख्या ५ हजार ५९८ झाली आहे.

देशातल्या एकूण रुग्णांपैकी ९५ हजार ५२६ रुग्ण बरे झाले आहेत. एकूण रुग्णांच्या तुलनेत हे प्रमाण ४८ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. कोरोनाग्रस्तांच्या एकूण संख्येचा विचार करता अमेरिका, ब्राझिल, रशिया, ब्रिटन, स्पेन आणि इटली नंतर सातव्या क्रमांकावर भारत आहे.

राज्यातल्या एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ७० हजार १३ झाली आहे. काल नवे २ हजार ३६१ रुग्ण आढळून आले. राज्यात काल ७६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २ हजार ३६२ झाली आहे.

राज्यातले ३० हजार १०८ रुग्ण आतामुळे कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत.