नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणपती आणि नवरात्र महोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर कायमस्वरुपी बंदी घालण्यात आली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं काल जाहीर केलेल्या नियमावलीत हे स्पष्ट करण्यात आलं आहे.
यावेळी मूर्तीकारांसह सार्वजनिक मंडळं, स्थानिक स्वराज्य संस्था आणि घरगुती उत्सव साजरा करणाऱ्यांसाठी देखील नियमावली तयार करण्यात आली आहे.