नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य सेवेला आता तंत्रज्ञानाची जोड देण्यात येणार आहे, त्यासाठी नाशिक जिल्ह्यात मालेगावच्या रुग्णालयात येत्या दोन दिवसात ‘टेली रेडीओलॉजी’ यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. मालेगावात कोविड १९ चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते.

नाशिकमध्ये ‘टेली मेडिसीनची’ व्यवस्था आणि स्पेशल टास्क फोर्सच्या मदतीने तज्ज्ञ डॉक्टर्सचा सल्ला रुग्णांना मिळणार आहे. नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी या लॅबमधून दररोज ३०० टेस्टींग रिपोर्ट २४ तासात मिळणार आहेत, तसेच धुळ्यात दररोज ४५० अहवाल देणारी नवीन लॅब पूर्ण क्षमतेने येत्या दोन दिवसात सुरु होणार आहे. त्यामुळे रुग्णांचे निदान आणि उपचार वेळेत होईल असं टोपे यांनी नमूद केलं.