नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्बियामधील बेलग्रेड इथं झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय महिला कुस्ती खेळाडू विनेश फोगाट हिनं, ५३ किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकलं आहे. या स्पर्धेत दोन पदक मिळवणारी विनेश, पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली आहे. तिनं विद्यमान युरोपियन स्पर्धा विजेती एमा माल्म्ग्रेन हिचा ८ – ० या फरकाने पराभव करून हे पदक पटकावलं. याआधी विनेशला पात्रता फेरीत पराभव पत्करावा लागला होता.