नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या संशोधन आरेखन आणि मानक संघटनेने (आरडीएसओ) 30 ऑगस्ट 2019 रोजी लखनौ इथे विशेष, विक्रेता महामेळावा 2019 आयोजित केला आहे. रेल्वे क्षेत्रातील व्यवसायांच्या संधीबाबत माहिती देण्यासाठी आरडीएसओमध्ये हा मेळावा आयोजित करण्यात आला असून, यासाठी देशभरातल्या उद्योजकांना आमंत्रित करण्यात आले आहे.

मेळाव्यात सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क नाही. अधिक सहभाग वाढविण्यासाठी एफआयसीसीआय, सीआयआय, ॲसोचॅम, आयईईएमए या संस्थांना कळविण्यात आले आहे.