नवी दिल्ली : खलाशांचा मौद्रिक बायोमेट्रिक डेटा घेऊन बायोमेट्रिक खलाशी ओळखपत्र जारी करणारा भारत हा जगातला पहिला देश आहे. नौवहन आणि खते व रसायन राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) मन्सुख मांडवीय यांच्या हस्ते नवी दिल्ली इथे या प्रकल्पाची सुरुवात झाली. पाच भारतीय खलाशांना त्यांच्या हस्ते नवी ओळखपत्र देण्यात आली.

नौवहन क्षेत्राचा वेगाने विकास होत असून, या क्षेत्रात रोजगारनिर्मिती वाढत आहे, असे मांडवीय यांनी यावेळी सांगितले. आंतरराष्ट्रीय नौवहन उद्योगात भारतीय खलाशांची संख्या वाढत आहे. भारतीय तसेच परदेशी नौकांवरील भारतीय खलाशांची संख्या 2017 मध्ये 1,54,349 होती. त्यात 35 टक्के वाढ होऊन यावर्षी ती 2,08,799 वर पोहोचली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

नव्या ओळखपत्रामुळे आपल्या खलाशांना प्रवास करणे सुलभ होणार आहे, तसेच नोकरी मिळवणेही सुलभ होणार आहे.