मुंबई (वृत्तसंस्था) : मध्य रेल्वेनं स्थानकांवर होणारी अनावश्यक गर्दी टाळायच्या हेतूनं सी एस एम टी अर्थात मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह सहा स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद केली आहे.

मध्य रेल्वेचे मुख्य प्रवक्ता शिवाजी सुतार यांनी ही माहिती दिली आहे. सी एस एम टी व्यतिरिक्त लांब पल्ल्याच्या गाड्या सुटणाऱ्या लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण, ठाणे, दादर आणि पनवेल या स्थानकांची प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद करण्यात आली आहे.

कोविड संसर्गाला आळा घालण्याच्या हेतूनं मध्य रेल्वेनं याआधीच प्लॅटफॉर्म तिकीटाचे दर १० रुपयांवरून वाढवून ५० रुपये केले आहेत.