नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात काल दिवसभरात २९ लाख, ३३ हजार ४१८ जणांचं लसीकरण करण्यात आलं. आतपर्यंत १० कोटी ४५ लाख २८ हजार ५६५ जणांचं लसीकरण झालं आहे. आरोग्य विभागांन आज सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार देशात काल २७ लाख १ हजार ४३९ जणांना लसीची पहिली मात्रा, तर २ लाख ३१ हजार ९७९ जणांना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली आहे.
आत्तापर्यंत राज्यात ९२ लाख २० हजार ६१० जणांना लसीची पहिली मात्रा, तर ९ लाख ७१ हजार ७४३ जणांना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली आहे. स्फुटनिक वी लसीला आपत्कालीन मान्यता देण्याच्या उद्देशानं आज विषय तज्ञ समितीची बैठक होणार आहे.