नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविशिल्ड या लसीच्या निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाच्या निर्यातीवरील बंदी अमेरिकेने उठवावी, अशी विनंती सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावला यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बाईडन यांना पत्र पाठवून केली आहे.

सध्या देशात कोविशिल्ड या लशीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. तसंच लस मैत्री, या अभियानांतर्गत कोविशिल्ड या लशींची मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जात आहे. सिरम इन्स्टिट्युटनं कोविशिल्डच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्चा मालासाठी सेपी या कच्चा मालाचे निर्मिती करणाऱ्या कंपनी बरोबरच ७५ कोटींचा करार केला आहे. सध्या या कच्च्या मालाच्या निर्मितीवर अमेरिकेनं बंदी घातल्यामुळे कोविशिल्डच्या निर्मितीवर परिणाम झाला आहे.