मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कठोर निर्बंध असले तरी नागरिक किराणा खरेदीच्या नावाखाली दिवसभर घराबाहेर निघत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे किराणा दुकाने सकाळी ७ ते ११ दरम्यान सुरू ठेवण्याचा विचार असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. यासंदर्भात लवकरच शासन निर्णय प्रसिद्ध होणार आहे. त्याचवेळी हवेतून ऑक्सिजन निर्मितीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्याचंही ते म्हणाले.
निर्बंधकाळात नागरिकांनामदत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या ५ हजार ४७६ कोटींच्या मदत पॅकेजचेलाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत तातडीनं पोचले पाहिजेत. त्यासाठी युद्धपातळीवर अंमलबजावणीकरण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत.