नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाबाधितांसाठी आवश्यक असलेल्या द्रवरुप वैद्यकीय ऑक्सिजनची वाहतूक करण्यासाठीची रेल्वेची तयारी पूर्ण झाली असल्याचं रेल्वे मंत्रालयानं कळवलं आहे.

रोरो सेवेच्या माध्यमातून ही वाहतूक केली जाईल. त्याअंतर्गत निर्धारित ठिकाणांवरून ऑक्सिजनसाठीचे रिकामे टँकर लोड केले जातील आणि ते ऑक्सिजन भरण्यासाठी पुढे पाठवले जातील.

मुंबईत कळंबोली स्थानकातून रिकामे टँकर लोड होतील आणि तिथून पुढे ते जमशेदपूर, रौरकेला आणि बोकारो इथं पाठवले जातील. राज्यातून परिवहन आगोयाच्या वतीनं टँकरचं नियोजन केलं जात असून, कळंबोली इथं १ हजार ६१८ टँकर आणले असल्याचंही रेल्वच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.