पिंपरी : महाराष्ट्र शासनाने रिक्षा चालक, फेरीवाले, बांधकाम, मजूर घरकाम महिला कामगार, यांना पंधराशे रुपये देण्याचे जाहीर केले आहे. या बरोबरच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने तीन हजार रुपये देण्याचे जाहिर केले आहे. ही बाब स्वागतार्ह आहे.

या बाबत हि रक्कम कशी मिळवायची? कोठे अर्ज करायचा? या बाबत अजून महानगरपालिकेने माहिती जाहीर केली नाही. यामुळे सर्व रिक्षा चालक मालक, फेरीवाले, बांधकाम मजूर, धुणीभांडी करणाऱ्या घरकाम महिला यांना मदत मिळवण्यासाठी स्थानिक नगरसेवकांच्या कार्यालयात फॉर्म मिळतील असे सोशल मीडिया द्वारे सांगितले जात आहे. लॉकडाऊनच्या काळात उदरनिर्वाहासाठी देण्यात येणारी मदत शेवटच्या स्तराच्या गरजूंपर्यंत पोहोचली पाहिजे. त्यात कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार हाता कामा नये. यासाठी विशेष कार्यप्रणाली तयार करण्यात यावी.

तरी देण्यात येणार्‍या मदतीत नगरसेवकांचा व कोणत्याही संस्था संघटनांचा हस्तक्षेप नसावा. त्यासाठी विशेष कार्यप्रणाली तयार करून, अधिकारी नेमून त्यांच्या देखरेखीत कामकाज करण्यात यावे. अशी मागणी लढा यूथ मूव्हमेंटचे अध्यक्ष प्रमोद क्षिरसागर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त मा.राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.