नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बाजारात ‘कोविप्री’ या नावानं आलेलं रेमडेसिवीर इंजेक्शन बनावट असल्याचं केंद्रसरकारनं स्पष्ट केलं आहे. कोविप्रि या नावानं रेमडेसिवीर अस्तित्वात नाही असं पत्रसूचना कार्यालयानं ट्विटमधे म्हटलं आहे.

लोकांनी खातरजमा न झालेल्या स्रोतांकडून  वैद्यकीय पुरवठ्याची खरेदी करु नये, तसंच बनावट इंजेक्शन आणि औषधांपासून सावध रहावं, असा सल्ला त्यात  दिला आहे.