मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना येत्या ३ दिवसात कोविड प्रतिबंधक लशीच्या ४८ लाख ४१ हजार मात्रा मिळतील, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे.
केंद्रसरकारनं आतापर्यंत कोविड लशींच्या १६ कोटी ६९ लाख मात्रांचा विनामूल्य पुरवठा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना केला आहे. त्यातले १५ कोटी ९४ लाख डोस वापरले गेले. तरीही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे अद्याप ७५ लाखाहून अधिक मात्रा शिल्लक आहेत, अशी माहिती आरोग्य विभागानं दिली आहे.
सर्वात जास्त म्हणजे १२ लाख ५७ हजार डोस उत्तर प्रदेशात, तर ७ लाख ५७ हजार डोस बिहारमध्ये शिल्लक आहेत.