नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भ्रष्टाचार रोखण्यासाठी, कॅग अर्थात नियंत्रक आणि महालेखा परिक्षकांनी नव्या पद्धतींचा विचार करावा, कॅगची भूमिका फक्त आकडेवारी आणि प्रक्रियांपुरती मर्यादित न ठेवता त्यांनी सुशासनासाठी उत्प्रेरक म्हणून करावं, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं महालेखापाल आणि उपमहालेखापालांच्या मेळाव्यात बोलत होते.
सरकारी खात्यांमधले घोटाळे रोखण्यासाठी कॅगनं तांत्रिक यंत्रणा तयार करावी, आणि देशाला ५ लाख कोटी डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्यात हातभार लावावा, असं आवाहन त्यांनी केलं. २०२२ पर्यंत सप्रमाण धोरण निश्चितीकडे वळण्याची सरकारची इच्छा असून त्यात कॅग थिंक टॅकची भूमिका बजावू शकेल, असंही मोदी म्हणाले.