मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठीच्या हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी काल रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत, त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊतही त्यांच्यासोबत होते.
शिवसेनेसोबत सरकार स्थापन करायला काँग्रेस कार्यकारिणीनं मंजुरी दिल्यानंतर सरकार स्थापनेसाठी होणा-या बैठकांचं केंद्र दिल्लीतून आता मुंबईत हललं आहे.
सरकार स्थापनेबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सर्व मुद्यांवर एकवाक्यता झाली असून, आघाडीसंदर्भात शिवसेनेबरोबर चर्चा केली जाईल, त्याआधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक होईल, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं. शिवसेना आमदारांचीही बैठक आज मातोश्रीवर होणार आहे.