नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अवकाळी पावासामुळे महाराष्ट्रात झालेल्या पिकांच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारच्या अधिकार्याचं पथक तीन दिवसांच्या दौर्यावर राज्यात येत आहे.
कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे संचालक डॉ. आर. पी सिंग यांच्या नेतृत्वाखाली हे पथक विदर्भातल्या नागपूर आणि अमरावती विभागात अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करणार आहे.
दरम्यान, बाधित शेतकर्यांना मदत वाटप करण्यासाठी १३ कोटी रुपयांचा पहिला हप्ता नागपूरच्या जिल्हाधिकर्यांना मिळाला आहे. नागपूर जिल्ह्यात १ लाख १९ हजार शेतकर्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे.