नवी दिल्ली : मुंबईत कोविड रूग्णांची संख्या वाढण्याचा अंदाज असला तरी मुंबई महापालिका सर्व तयारीनिशी सज्ज आहे. येत्या काळात रूग्ण संख्या वाढली तर त्यासाठी आवश्यक खाटांचे नियोजन केलेलं आहे.
सध्या ७५ हजार खाटा तयार असल्याची माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दिली. वाढत्या रुग्णसंख्येचा अंदाज घेऊन खाजगी रूग्णालयांसह विविध ठिकाणी खाटांची व्यवस्था केली जात आहे.
१५ जूनपर्यंत एक लाख खाटा उपलब्ध होतील असं नियोजन केलं आहे. कोविड काळजी केंद्रांमधे ३० हजार खाटा तयार असून डीसीएच-डीसीएचसीमध्ये येत्या ३१ मेपर्यंत १४ हजार खाटा उपलब्ध होणार आहेत.
वरळी इथल्या एनसीआयसीमध्ये ६४० खाटा – त्यात(४० खाटांचा अतिदक्षता विभाग, महालक्ष्मी रेसकोर्स ३००, बीकेसीत एक हजार, नेस्को गोरेगाव इथं ५३५ अशा एकूण २ हजार ४७५ खाटा उपलब्ध होतील, अशी माहिती पालिका आयुक्तांनी दिली.