नवी दिल्ली : कोरोना टाळेबंदीच्या काळात सर्व प्रकारच्या वाहतूक सेवा मर्यादित असताना राज्याच्या कृषी आणि पणन विभागानं २ लाख ९९ हजार मेट्रिक टन मालाची निर्यात केली आहे.

त्यात ८ हजार ६४० टन आंबा,३३ हजार ९४८ टन केळी, ९ हजार ५०९ टन द्राक्ष, १ हजार ७७३ टन डाळिंब, त्याचबरोबर २ लाख २६ हजार टन कांदा, ६५३ टन लिंबू, १ हजार ५२२ टन मिरची, १ हजार १६८ टन आलं आणि १७ हजार १५१ टन इतर फळं आणि, भाजीपाल्याचा समावेश आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा केळी, लिंबू, मिरची आणि आल्याची जास्त निर्यात झाली आहे.