नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांचा मोठ्या हल्ल्याचा कट सुरक्षा दलांच्या सतर्कतेमुळे उधळून लावण्यात यश आलं आहे.

एका चारचाकी वाहनातून मोठ्या प्रमाणावर नेली जात असलेली स्फोटकं सुरक्षा दलांनी ताब्यात घेऊन नष्ट केली. काश्मीर पोलिसांनी ट्वीटरवरून याबाबत माहिती दिली. सैन्य दल, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि पुलवामा पोलिसांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.