नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीमारामन यांनी नवी दिल्लीत दुसरी अर्थसंकल्पपूर्व सल्लागार बैठक घेतली. आणि आर्थिक क्षेत्रातले विविध भागधारक या बैठकीला उपस्थित होते.
आगामी वर्षाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात मांडायच्या विविध मुद्यांबाबत भागधारक आणि सल्लागारांशी चर्चा करण्यासाठी अर्थमंत्र्यांनी ही बैठक घेतली. येत्या 1 फेब्रुवारीला निर्मला सीतारामन अर्थमंत्री म्हणून त्यांच्या कार्यकाळातला दुसरा अर्थसंकल्प संसदेत सादर करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर, अर्थ सचिव, आर्थिक व्यवहार सचिव, महसूल सचिव, मुख्य आर्थिक सल्लागार, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष तसंच केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष आजच्या बैठकीला उपस्थित होते.