मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेबठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज गोरेगाव इथल्या नेस्को मैदानावर मनसेचं अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाच्या निमित्तानं आज सकाळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या नव्या झेंड्याचं अनावरण केलं. मनसेचा नवा झेंडा भगव्या रंगाचा असून, त्यावर शिवरायांची राजमुद्रा आहे.
या अधिवेशतानाच राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांची मनसेच्या नेतेपदी निवड करण्यात आली, तसंच त्यांच्या राजकारणातल्या प्रवेशाची औपचारीक घोषणाही करण्यातआली. या अधिवेशनासाठी राज्यभरातून असंख्य कार्यकर्ते आले आहेत. अधिवेशनासाठी आलेल्या कार्यकर्त्यांनासंबोधित करण्यासाठी राज ठाकरे नुकतेच अधिवेशनाच्या ठिकाणी दाखल झाले.
मनसेनं आपलाझेंडा बदलल्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आपल्या भाषणातून नेमकी काय भूमिका मांडतात, याबद्दल राजकीय वर्गात मोठी उत्सुकता असल्याचं चित्र आहे.