नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्लगेरियात सुरु असलेल्या स्ट्रँडजा स्मृती मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या निखत झरीन आणि चार वेळचा विजेता शिवा थापा यांनी उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. ब्लगेरियाचा गतवेळेचा विजेता सेवदा असेनोवा यानं माघार घेतल्यामुळे झरीनला पुढं चाल मिळाली.
६३ किलो वजनी गटात शिवा थापानं पोलंडच्या पावेल पोलाकोव्हीकला ५-० नं हरवलं. ६९ किलो वजनी गटात दुर्योधन नेगी आणि मोहम्मद हुसामउद्दीन यांनी दुसरी फेरी गाठली आहे. तीसपेक्षा जास्त देशांमधल्या मुष्टीयोद्ध्यांनी या स्पर्धेत भाग घेतला आहे.