नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 123 व्या जयंतीनिमित्त आज देश त्यांना आदरांजली वाहत आहे. त्यानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नेताजींना आदरांजली वाहिली आहे.
सुभाषचंद्र बोस हे भारताच्या स्वांतत्र्यलढ्याचे एक नायक होते आणि सर्वाधिक लोकप्रिय राष्ट्रीय नेते म्हणून जनमानसात त्यांचं स्थान कायम आहे, असं राष्ट्रपतींनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे. सभाषबाबूनीं लोकांमधे देशभक्ती रुजवली आणि स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्याची प्रेरणा हजारो लोकांना दिली, असं नायडू यांनी म्हटलं आहे.
तर सुभाषबाबूचं शौर्य आणि वसाहतवादाच्या विरोधातलं त्यांच्या योगदानाबद्दल देश कायम ऋणी राहील, असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे.
औरंगाबादच्या महावितरण प्रादेशिक कार्यालय आणि महावितरण परिमंडळ कार्यालयात देखील आज प्रभारी प्रादेशिक संचालक सुरेश गणेशकर यांच्या हस्ते, बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.