मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई शहर आणि उपनगरातील कोळीवाड्यांच्या सीमांकनाबाबत पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत काल बैठक झाली. मुंबईतील उर्वरीत कोळीवाड्यांचं सीमांकन जलदगतीनं पूर्ण करावं अशा सूचना यावेळी आदित्य ठाकरे यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या.
कोळीवाडे, आदिवासी पाडे किंवा गावठाणाचा भाग लगत आहे तिथे कोळीवाड्याचं सीमांकन करणं गरजेचं आहे. मुंबईतील बहुतांश कोळीवाड्यांचं सीमांकन झालं असून उर्वरित कोळीवाड्यांचं सीमांकन करण्यासाठी संबंधीत यंत्रणांनी लवकर सर्वेक्षण करावं अशा सूचना असलं शेख यांनी दिल्या.