नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनच्या फुझोह इथं खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू परुपल्ली कश्यप आणि बी साईप्रणीत यांचे दुस-या फेरीतले सामने आज होणार आहेत. कश्यपचा सामना डेन्मार्कच्या सातव्या मानांकित व्हिक्टर अँँक्सेल्सन याच्याशी तर बी साईप्रणीतचा चौथ्या मानांकित अँँन्डर्स अँँन्टोन्सन याच्याशी होणार आहे.

मिश्र दुहेरीमधे सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि अश्विनी पोनप्पा यांचा दक्षिण कोरियाच्या सेऊंग जे सियो आणि युजूंग चे यांच्याशी सामना होणार आहे. तर पुरुष दुहेरीत रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचा जपानच्या हिरोयुकी एंडो आणि युता वातानाबे यांच्याशी सामना होईल.